खोकल्यासाठी काय?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:46

खोकल्यासाठी नॅच्युरल कफ सिरप आहेत हे 5 घरगुती उपाय, करतात कफ मुळापासून नष्ट व फुफ्फुसांचे रक्षण :

कोरडा खोकला ही तशी सामान्य समस्या, पण ही समस्या किती बेजार करू शकते हे कोरडा खोकला (dry cough) झाल्याशिवाय कळणार नाही. ही अशी समस्या आहे जी आपल्याला वाटते की लगेच जाईल. पण कसलं काय जेव्हा 2-3 दिवस होऊन सुद्धा कोरडा खोकला जात नाही तेव्हा आपल्याला ही समस्या सुद्धा गंभीर होऊ शकते याची उपरती होते आणि मग आपण उपायांच्या मागे लागतो. पण तुम्हाला माहित आहे का कसा असतो कोरडा खोकला?

अ‍ॅलर्जीपासून अ‍ॅसिड रिफ्लक्सपर्यंत अनेक गोष्टी या कोरड्या खोकल्याचे कारण बनू शकतात. तर काही प्रकरणांमध्ये कोरडा खोकला होण्यामागे काही विशेष कारण सुद्धा नसते. कारण असो वा नसो, पण एक गोष्ट लक्षात घ्या की सतत होणारा कोरडा खोकला हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर मात्र मोठा गंभीर परिणाम करू शकतो. त्यात जर हा खोकला रात्रीचा सुरू झाला तर मात्र दिवस आणि रात्र दोन्ही खराब झालीच म्हणून समजा.

किती दिवस राहतो कोरडा खोकला?

जर एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला झाला असेल तर तो 8 आठवडे राहू शकतो. म्हणून कोरड्या खोकल्याला क्रॉनिक म्हटले जाते. कारण मोठ्या माणसांमध्ये 8 आणि लहान मुलांमध्ये 4 आठवडे हा खोकला राहू शकतो. यापेक्षा जास्त वेळ जर खोकला राहिला तर मात्र फुफ्फुसांमध्ये कॅन्सर झाल्याचे संकेत असू शकतात. सामान्यत: कोरडा खोकला रात्रीच्या वेळी जास्त त्रास देतो. अनेकदा हा खोकला कंट्रोल करण्यासाठी प्यायलेले ड्राय कफ सिरपसुद्धा बिनकामाचे ठरते. अशावेळी तुम्ही काय काय घरगुती उपाय करू शकता ते जाणून घेऊया.

गरम पाणी आणि मध

1 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या माणसांसाठी आणि मुलांसाठी मधाचा वापर कोरड्या खोकल्यावर रामबाण ठरू शकतो. यामागचं कारण म्हणजे मधात जीवाणूविरोधी म्हणजेच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जळजळ कमी करणे आणि गळ्याला कोट करणे यामध्ये मदत करतात. तुम्ही दिवसातून अनेक वेळा 1 चमचा मधाचे सेवन करू शकता. जर चहा आणि गरम पाण्यात मिक्स करून तुम्ही मधाचे सेवन केले तर त्याचे अजून उत्तम परिणाम तुम्हाला दिसून येतील.

हळद आणि काळी मिरी

हळदीत करक्यूमिन असते. जे एक योगिक आहे आणि यामध्ये अँटीइन्फ्लेमेट्री, अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळेच हळद ही कोरड्या खोकल्यावर एक जालीम उपाय ठरू शकते. काळीमिरी सोबत हळदीचे सेवन केल्याने करक्यूमिन हे रक्तप्रवाहामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होते किंवा अवशोषित होते. तुम्ही संत्रीच्या रसासारख्या पेयांमध्ये एक चमचा हळद आणि 1/8 चमचा काळीमिरी मिक्स करून त्याचे सेवन करू शकता.

आले आणि मीठ

एका संशोधनानुसार, असे आढळून आले की आल्यामध्ये अँटीमायक्रोबियल म्हणजेच बॅक्टेरिया नष्ट करणारे गुणधर्म असत्तात. अशावेळी कोरड्या खोकल्यापासून आराम देण्यासाठी आले तुमची मदत करू शकते. आल्याचा एक छोटासा तुकडा घेऊन त्यावर एक चिमूटभर मीठ किंवा मध लावा आणि हा तुकडा दातांच्या खाली दाबून ठेवा. आता अशाच प्रकारे आल्याचा रस हळूहळू आत तोंडात जाऊ द्या. जवळपास 5 ते 7 मिनिटे ठेवून मग गुळण्या करा.

तूप आणि काळीमिरी

तुपामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म घशाला नरम ठेवण्याचे काम करतात. जर तुम्ही तुपामध्ये काळीमिरी पावडर मिक्स केली आणि त्याचे सेवन केले तर तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून खूप जास्त आराम मिळू शकतो.

मीठ आणि पाणी

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने कोरड्या खोकल्यामुळे होणारी अस्वस्थता आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. खारट पाणी तोंड आणि घशातील बॅक्टेरिया मारण्यास देखील मदत करते. हे करण्यासाठी एका मोठ्या ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ घाला. नंतर दिवसातून अनेक वेळा या पाण्याने गुळण्या करा.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info